PM Internship Scheme: पीएम इंटर्नशिप योजना 2024 नोंदणी सुरू
PM Internship Scheme 2024: पीएम इंटर्नशिप स्कीम 2024 साठी नोंदणी प्रक्रिया 12 ऑक्टोबर पासून सुरू झालेले आहे तरी ज्या उमेदवारांना आपले अर्ज सादर करायचे आहेत त्या उमेदवारांनी अधिकृत पोर्टलवर जाऊन इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करायचा आहे ही योजना कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे सुरू केलेले आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपला अर्ज सादर करायचा आहे.
मोदी सरकारने (Modi Government) बेरोजगार तरुणांसाठी ही पीएम इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. त्यांना नोकरीची संधी मिळावी. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आर्थिक वर्ष 2024-2025 साठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात (Union Budget) या योजनेची घोषणा केली गेली होती.
योजनेचे नाव : पीएम इंटर्नशिप योजना 2024
शैक्षणिक पात्रता: 10 वी/12 वी/ITI /Diploma/BA/B.Sc/B.com/BCA/BBA/B.Pharma
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2024
फी: कोणत्याही प्रकारची फी नाही.
वयाची अट: 21 ते 24 वर्षे
जाहिरात पहा | Click here |
ऑनलाइन अर्ज करा | Click here |
अधिकृत संकेतस्थळ | Click here |
Join WhatsApp | Join Now |
Join Telegram | Join Now |
पीएम इंटरसिटी योजना 2024 साठी कसा अर्ज करायचा?
- पीएम इंटर्नशिप (PM Internship Scheme 2024) योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://pminternship.mca.gov.in/ या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल.
2. त्यानंतर रजिस्टर लिंक वर क्लिक करा त्यानंतर एक नवीन पेज उघडेल.
3. तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे नोंदणीचे तपशील भरायचे आहेत त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
4. आता उमेदवारांना दिलेल्या माहितीच्या आधारे पोर्टल द्वारे बायोडाटा तयार केला जाईल.
5. त्यानंतर तुम्हाला ठिकाण क्षेत्र कार्यात्मक भूमिका आणि पात्रता यावर आधारित जास्तीत जास्त पाच इंटर्नशिप संधीसाठी अर्ज करावा लागेल.
6. त्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल आणि पुष्टीकरण पृष्ठ डाऊनलोड करावे.
7. तुम्हाला तुमच्या भविष्यातील वापरासाठी तुम्ही याची हार्ड कॉपी काढून तुमच्याकडे ठेवू शकतात.
पीएम इंटर्नशिप चा कालावधी किती असेल?
या योजनेअंतर्गत उमेदवारांना बारा महिन्यासाठी इंटर्नशिप करावी लागणार आहे पाच वर्षात एक कोटी उमेदवारांना टॉप 500 कंपन्यांमध्ये त्यांची संधी दिली जाणार आहे या आर्थिक वर्षांमध्ये केंद्राने शीर्ष कंपन्यांमध्ये 1.25 लाख संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट सुद्धा ठेवलेले आहे त्यामुळे इंटर्नशिप दरम्यान उमेदवाराला दरमहा पाच हजार रुपये स्टायपेंड म्हणून दिला जाणार आहे.