मुंबई विद्यापीठाची एलएलएम (LLM) प्रवेश परीक्षा पुढे ढकलली विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट
मुंबई विद्यापीठाची (Mumbai University) पदवीधर विधी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा आयआयबीएफ च्या परीक्षांमुळे पुढे ढकलण्यात आले आहे आधी ही परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी होणार होती परंतु ती आता काही कारणामुळे 17 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
काय आहे कारण ?
7 ते 14 नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण भारतात आयआयबीएफ च्या परीक्षा आयोजित असल्याने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती अडचण येऊ नये यासाठी घेण्यात आलेला आहे.
एलएलएम प्रवेश पूर्व परीक्षा (LLM Pre-Entrance Examination) 10 नोव्हेंबर ऐवजी 17 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉक्टर पूजा आंधळे यांनी सांगितले आहे.
एलएलएम (LLM) प्रवेश परीक्षा काय आहे ?
एलएलएम प्रवेश परीक्षा ही एक लेखी परीक्षा असून यात विधीक्षेत्रातील विविध विषयांवर प्रश्न विचारले जातात यात संविधान, फौजदारी कायदा, दिवाणी कायदा, आंतरराष्ट्रीय कायदे आणि मानवाधिकार यांसारखे विषय समाविष्ट असतात याशिवाय लॉजिकल रीजनिंग आणि सामान्य ज्ञान या विषयांवरही प्रश्न विचारले जात असतात.
आयआयबीएफ च्या परीक्षा पूर्वनियोजित आहे काही उमेदवार दोन्ही परीक्षा देत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तरी मुंबई विद्यापीठाच्या LLM प्रवेश पूर्व परीक्षा मुळे विधीक्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचे संधि उपलब्ध होणार आहेत. या परीक्षा द्वारे गुणवत्ता आणि क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांची निवड होईल तसेच ज्यामुळे विधी क्षेत्रात भविष्य घडवण्यास मदत होईल.