Maharashtra TET 2024 Admit Card: येत्या 10 नोव्हेंबरला होणार महाराष्ट्र TET ची परीक्षा असे करा डाउनलोड हॉल तिकीट
Maharashtra TET 2024 Admit Card: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात आहे या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे ते आता अधिकृत वेबसाईट mahatet.in वरून प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात.
महाराष्ट्र टीईटी परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये होणार आहे. परीक्षा केंद्रात जाण्यासाठी उमेदवाराकडे हॉल तिकीट असणे बंधनकारक असेल. (How to download maha tet hall tickets)
महाराष्ट्र टीईटी परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे?
- पहिला पायरी: महाराष्ट्र टीईटीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- दुसरा पायरी :तिथे उमेदवारांना ऍडमिट कार्ड डाउनलोड लिंक दिसेल, तिथे क्लिक करा.
- तिसरा पायरी: पुढे लॉगिन क्रेडेन्शियल च भरा.
- चौथा पायरी: त्यानंतर महाराष्ट्र टीईटी परीक्षेचे प्रवेश पत्र दिसेल.
- पाचवा पायरी: तपासून डाऊनलोड करा.
महत्त्वाची माहिती (Maharashtra tet 2024 admit card important information ):
परीक्षेची वेळ: सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 (पहिला पेपर) दुपारी 2 ते 4.30 (दुसरा पेपर)
परीक्षा पद्धत: ऑफलाइन
पात्रता निकष: इयत्ता पहिली ते पाचवीसाठी आणि इयत्ता पाचवी ते आठवीसाठी वेगवेगळे पात्रता निकष आहेत. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहा.
काळजी घ्या:
- प्रवेश पत्र दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा.
- प्रवेश पत्र दोन प्रती काढून ठेवा.
- परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र आणि ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे.
अतिरिक्त माहिती:
- परीक्षेची तयारी कशी करायची? याबाबतचे मार्गदर्शन आपल्याला ऑनलाइन आणि ऑफलाइन मिळू शकते.
- परीक्षेच्या दिवशी आपल्या सोबत आवश्यक असलेल्या वस्तूंची यादी तयार करा.
- परीक्षेच्या दिवशी वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचा.