लाडकी बहीण (ladki bahin)योजना सुरूच राहणार! अदिती तटकरे यांनी ट्विट करून सांगितले पहा संपूर्ण माहिती
Ladki bahin latest news updates: महाराष्ट्रातल्या महिलांसाठी सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत स्पष्ट केले आहे की ही योजना सुरूच राहणार आहे.
विधानसभा निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर झाल्यावर मतदारांना प्रभावित करणाऱ्या योजनांवर बंदी घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामुळे लाडकी बहीण योजनेच्या (ladki bahin yojana) भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते मात्र मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले की, शासनाने जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांचा लाभ पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला आहे. डिसेंबर महिन्याच्या लाभ डिसेंबर मध्ये दिला जाणार आहे.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या:
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (ladki bahin yojana) सुरूच राहणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहे. शासनाने जुलै,ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठी चा लाभा आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे. तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती!”
या योजनेचा उद्देश:
- महिलांचे सक्षमीकरण
- आर्थिक स्वावलंबन
- सामाजिक सुरक्षा
महत्त्वाची माहिती:
- लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे.
- या योजनेचा लाभ 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना मिळतो.
- दरमहा 1500/- रुपये थेट खात्यात जमा होतात.